Surprise Me!

विठ्ठल-रुक्‍मिणीचा शाही विवाह सोहळा थाटात संपन्न. | Pandharpur | Maharashtra | Sakal Media |

2021-04-28 2 Dailymotion

पंढरपूर (सोलापूर) : "या पंढरी नगरीत... काय वाजत गाजत... सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागलं...' अशा उत्साहात आज (मंगळवारी) साक्षात विठ्ठल- रुक्‍मिणीचा शाही विवाह सोहळा दुपारी 12 वाजता मोठ्या उत्साहात विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिरात पार पडला. <br />माघ शुद्ध पंचमी म्हणजे वसंत पंचमी. वसंताची चाहूल लागते म्हणून माघ महिन्यातील शुद्ध पंचमीला वसंत पंचमी साजरी केली जाते. हाच दिवस श्री विठ्ठल- रुक्‍मिणीचा विवाह सोहळा म्हणून साजरा करतात. आज राजेशाही पद्धतीने हा विवाह सोहळा विठ्ठल मंदिरात मोठ्या दिमाखात आणि उत्साहात संपन्न झाला. <br />आज श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिर संपूर्ण फुलांनी सजले होते. ज्या ठिकाणी देवाचा विवाह होतो तो सभामंडप लाल- पिवळ्या व पांढऱ्या फुलांच्या माळांनी सजला होता. यासाठी तब्बल पाच टन फुले वापरली आहेत. पुण्यातील भाविक भारत भुजबळ यांनी आकर्षक सजावट केली.<br />भारत नागणे <br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon